माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचे निधन…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी तसेच माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

त्यांची कारकीर्द ही 1972 च्या काळात लोकल बोर्ड सदस्य, त्यानंतर 1978 पासून सलग तीन वेळा ते आमदार राहिले. आमदारकीच्या काळात विधानसभेवर कापुस एकाधिकार शाही विरोधात शिंगाडे मोर्चा काढला होता. कुस्सा मोर्चा अशी अनेक आंदोलने आमदारकीच्या काळात केली होती. सुरुवातीला जनता पक्ष नंतर जनता दल तर्फे निवडणूक लढवून विजय प्राप्त केला अपक्ष म्हणून लढतांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेत अहिराणीत शपथ घेणारे पहिले आमदार होते. माळी समाजावर त्यांचे विशेष प्रेम होते. तसेच ते साथी संदेश या वृत्तपत्राचे तालुक्यातील पहिले पत्रकार होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.