गाडीच्या डिक्कीतून शेतकऱ्याचे दोन लाख रुपये लंपास

सोने गहाण ठेवून काढले होते कर्ज

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील शेतकरी अशोक मन्साराम पाटील यांनी भारतीय स्टेट बँक शाखेत सोने तारण ठेवून दोन लाख रुपयाचे कर्ज काढले होते.  ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती लंपास केल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.  या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील अशोक मन्साराम पाटील हे शेतकरी हे एम एच १९ बी डब्ल्यू ३०५८ क्रमांकाच्या त्यांच्या एरंडोल येथे भारतीय स्टेट बँक शाखेत सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी आले होते. बँक शाखेत जाऊन सोने तारण कर्ज मंजूर करून त्याची मिळणारी दोन लाख रुपयाची रक्कम त्यांनी ताब्यात घेतली.  सदर रक्कम पिशवीमध्ये ठेवली व बँक शाखेबाहेर येऊन त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली व लॉक केली.

दुचाकी घेऊन थोड्या अंतरावर गेले असता सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत काढण्यासाठी ते झेरॉक्स दुकानावर गेले. दरम्यान मोटर सायकलची डिक्की  उघडी बघितले असता त्यात ठेवलेले दोन लाख रुपयाची रक्कम व सातबाराचा उतारा, सोने तारण, कर्ज पावती, आधार कार्ड, स्टेट बँकेचे पासबुक व चेक बुक हे ठेवलेल्या ठिकाणी दिसून आलेले नाही. त्याबाबत स्टेट बँक शाखेच्या परिसरात व एरंडोल शहरात शोध घेतला असता सदर रक्कम मिळून आली नाही.  कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोने तारण कर्जाची रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब फौजदार सुनील लोहार, योगेश महाजन राजेश पाटील, अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.