मराठमोळ्या लग्नात इंग्रजी मंगलाष्टके ! पहा भटजींचा स्वॅग (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लगीनसराई सुरु आहे. त्यातच सोशल मीडियावर एका लग्नाची मोठी चर्चा रंगली आहे. एका मराठमोळ्या लग्नात चक्क भटजींनी इंग्रजी मंगलाष्टके गायली आहेत. या लग्न सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/Cl8eQi0jhJi/?utm_source=ig_web_copy_link 

हा व्हिडिओ जिग्नेश माळी या इंस्टाग्राम युजरने शेअर केला असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील एका मराठमोळ्या जोडप्याच्या लग्नातील असल्याचे दिसत आहे. अनेकांनी या गुरुजींच्या इंग्रजीचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी निदान तुम्ही तरी आपल्या संस्कृतीचा मान ठेवा असे म्हणत टीका केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.