चक्क हत्ती खातोय पाणीपुरी.. व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं.  पण एखादा हत्ती पाणीपुरी खातो हे ऐकल्यावर आपणही आश्चर्यचकित व्हाल. हो पण हे खरं आहे. आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.   .

https://twitter.com/elokshahi/status/1581559921296175106?t=eeaGb2YNwtsptgBsz7MO0A&s=09

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक हत्ती ठेल्यावर पाणीपुरी खात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही पाणीपुरी खाण्याची इच्छा होईल. पण व्हिडिओ बघितल्याशिवाय आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा हत्तीचा हा व्हिडिओ आसाममधील तेजपूरचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पाणीपुरीच्या स्टॉलवर देखील लोकं पाणीपुरी खाण्यासाठी उभे आहेत. अशात या ठिकाणी चक्क हत्ती उभं राहून पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. पाणीपुरीवाला सुद्धा एकएक करुन हत्तीला पाणीपुरी खाऊ घालत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.