निवडणूक मतदार यादीत अखेर वाढवले दोन नाव

उच्च न्यायालयाच्या आदेशाने बदल

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील बहुसंख्य गावांमधील नागरिकांचे मतदार यादी मधून नावे प्रशासनाच्या चुकीमुळे कमी करण्यात आलेले होते. नागरिकांची जानेवारी 2023 च्या मतदार यादीत नावे असताना त्यांची नावे एप्रिल 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी मधून स्थलांतर तसेच इतर काही कारणास्तव वगळण्यात आलेली होती. त्यामुळे सुरू असलेल्या ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नव्हते.

म्हैसवाडी तालुका यावल येथील सुहास सुकलाल कोळी तसेच काजल प्रकाश बाविस्कर यांचे नाव देखील स्थलांतराचे कारण देऊन मतदार यादीतून वगळण्यात आलेले होते. त्यांनी एडवोकेट जितेंद्र पाटील यांचेमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 12 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालयात प्रकरण दाखल झाले. त्यावर न्यायालयाने दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तात्काळ सुनावणी घेऊन प्रशासनास संबंधितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार काजल प्रकाश बाविस्कर यांनी उमेदवार म्हणून म्हैसवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्जदार दाखल केला.

मतदार यादीमधून कोणतेही कारण नसताना अशा बऱ्याच मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहे. ज्यांची नाव वगळण्यात आलेली होती, त्यांची नावे फायनल मतदार यादीमध्ये घेण्यासाठी 21 ऑगस्ट पर्यंतची मुघदत असल्याने दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी संबंधितांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यावल यांच्याकडे योग्य पद्धतीने हरकत घेतलेली होती. तरी देखील त्यांची नावे फायनल मतदार यादीत समाविष्ट नव्हती. त्यांनी ऍड अजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये धाव घेऊन एडवोकेट जितेंद्र पाटील यांच्यामार्फत न्यायालयात बाजू मांडली व त्यांना मा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून योग्य तो न्याय मिळाला.

पुरवणी यादीत वाढवले नाव

प्रारंभी राज्य निवडणुक आयोगाच्या सुचने नुसार जाहिर करण्यात आलेल्या मतदार यादीत दोन मतदारांचे नाव नसल्याची तक्रार होती तेव्हा संबधीतांनी या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडनपिठात तक्रार केली होती. तेव्हा खंडपिठाने निवडणुक आयोगास केलेल्या आदेशान्वये पुरवणी यादीत दोन नावं समाविष्ठ केले आहे.

– मोहनमाला नाझीरकर, तहसिलदार यावल

Leave A Reply

Your email address will not be published.