एकनाथराव खडसेंना दिलासा; ED च्या नोटिसला हायकोर्टाची स्थगिती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने घर खाली करण्याची नोटिस दिली होती, या नोटिसला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी दिली.

एकनाथराव  खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ईडीला पत्र लिहून हायकोर्टाने दिलेल्या ऑर्डरसंदर्भात कळवले आहे. दिल्ली हायकोर्टाने ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेवर आणि अडजुडीकटिंग अथोरिटीने दिलेल्या ऑर्डरवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता एकनाथराव खडसे यांना घर खाली करावे लागणार नाही. ईडीने एकनाथराव खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याची नोटीस दिली होती.

प्रकरण काय आहे?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. या नोटिसमध्ये जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याचे आदेश दिले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती. खडसेंच्या ११ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले होते. एकनाथराव खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खडसेंना ३० मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळामध्ये खडसेंची मालमत्ता आहे. ही मालमत्ता खाली करण्याचे आदेश ईडीने दिले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.