विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे

0

मुक्ताईनगर ,लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र पक्षातर्फे विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोर्‍हे यांना प्रदान करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.