रायसोनी महाविद्यालयात शिक्षण दिन व मौलाना आझाद जयंती उत्साहात साजरी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. या निमित्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलतर्फे विद्यार्थ्यांसाठी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

“रोल ऑफ एज्युकेशन टू सोल्व्ह सोशल अॅन्ड लोकल प्रोब्लेम्स इन सोसायटी” या विषयावर यावेळी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट शाखेतील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेचे उद्घाटन डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी केले. यावेळी त्यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या विषयी माहिती सांगितली. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरा केली. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो अशी माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी स्पर्धेला प्रा. प्रमोद गोसावी, प्रा. अंकुर पांडे, प्रा.मधुर चव्हाण, प्रा. अमित म्हसकर आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समन्वय इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे नियोजन केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.