खाद्य तेल स्वस्त होणार, सरकारकडून कस्टम ड्यूटी रद्द

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारनं खाद्य तेलाचे दर कमी करण्याच्या दृष्टीकोनातून २ वर्षांसाठी खाद्य तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द केली आहे. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द करण्यात आली. खाद्य तेलावरील कृषी, मूलभूत शुल्क आणि विकास सेस देखील रद्द करण्यात आला आहे.

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सूर्यफूल तेलावरील आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी दरवर्षाकाठी २० लाख मेट्रीक टनचं आयात शुल्क रद्द करण्यात आलं आहे. यासोबतच सीमा शुल्क आणि कृषी सेससह डेव्हलपमेंट सेस देखील रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे.

याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. बाजारात खाद्य तेलाचे दर यामुळे कमी होतील अशी आशा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.