ग्रा. वि. अधिकारी, चौकशी अधिकारी, व गटविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दंडात्मक कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी.

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 एरंडोल

कासोदा: येथील संत रोहिदास नगर (चांभारवाडा) येथील लहान बालकांच्या अंगणवाडी शेजारी कैलास बालकिसन अग्रवाल यांनी अतिक्रमण करून घेतले असून त्याबाबत पत्रकार जितेंद्र ठाकरे यांनी कासोदा ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांना अगोदर  तोंडी व लेखी तक्रार केली होती.त्यानुसार ग्रामपंचायत ने फक्त तक्रारदाराचे समाधान व्हावे या हेतूने दोन थातूरमातूर नोटिसा देऊन वेळ मारून नेली आहे.

कारण की सदर बांधकाम हे कासोदा ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय कार्यकाळ सुरू असताना करण्यात आले होते. त्यावेळेस ग्राम विकास अधिकारी के.डी.मोरे हे  ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. व  आज पण तेच ग्राम विकास अधिकारी म्हणून कासोदा येथे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी अतिक्रमण धारकांकडून काहीतरी आर्थिक देवाण-घेवाण करून घेतलेली  दिसत आहे. कारण सदर अतिक्रमण आज पण जैसे थे आहे.

म्हणून तक्रारदाराने त्यानंतर  एरंडोल गट विकास अधिकारी यांच्याकडे 3 जानेवारी 2022 रोजी लेखी तक्रार केली. त्यांनी चौकशी अधिकारी नेमून 9 फेब्रुवारी रोजी चौकशी अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी पाठवले. परंतु त्याचाही काही उपयोग झालेला दिसत नाही. म्हणून वरील तिघ अधिकारी यांनी संगनमत करून घेतल्याचे दिसत आहे.

याकरिता  तक्रारदार ठाकरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ग्रामपंचायत विभाग जळगाव यांच्याकडे कासोदा ग्रामविकास अधिकारी, एरंडोल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ( चौकशी अधिकारी),एरंडोल गट विकास अधिकारी यांची चौकशी होऊन दंडात्मक कारवाई करून निलंबित करून अतिक्रमण त्वरीत काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच

एरंडोल  पंचायत समितीतील अधिकारी व गट विकास अधिकारी बाबत तालुक्यातील अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. परंतु वरिष्ठ ही याकडे कानाडोळा करत आहे म्हणून असे न होता वरिष्ठांनी जातीने लक्ष देऊन तक्रारींचा निपटारा व्हावा अशी मागणी एरंडोल तालुक्यात जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.