चोपडा म.सा.प.चे कार्य साहित्यिकांना प्रेरणा देणारे: प्रा.तानसेन जगताप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा;  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेने आजवर जे कार्य केले ते निश्चित  प्रेरणादायी आहे त्यामुळे मी प्रसन्न झालो,आनंदीत झालो,सद्गगतीत झालो, समाधानी झालो.समाजात दान देण्याची प्रवृत्ती

पुस्तकांसाठी,साहित्यिकांसाठी व त्यांचे साहित्य कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने वाढली पाहिजे असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषदचे पुणे शाखेचे प्रतिनिधी व जळगाव जिल्ह्याचे संचालक प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव)यांनी केले आहे. चोपडा शहरातील पंकज विद्यालयाच्या खुल्या रंगमंच सभागृहात ता.4 मार्च रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत प्राध्यापक जगताप बोलत होते.

अध्यक्षस्थानी शाखेचे संस्थापक कवी अशोक निलकंठ सोनवणे होते.तर व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम भाई अग्रवाल, ख्यातनाम धन्वंतरी डॉक्टर विकास काका हरताळकर, श्रीकांत नेवे,कार्याध्यक्ष विलास पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, प्रमुख कार्यवाह संजय बारी होते.

सायंकाळी ०७.००वाजता वार्षिक सभेला सुरुवात झाली. साहित्यिकांच्या व सभासदांच्या खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. कार्यकारी मंडळाचे कार्यवाह संजय बारी यांनी इतिवृत्त वाचन केले रोटरी प्रेसिडेंट व म.सा.प. विश्वस्त मंडळाचे सदस्य पंकज बोरोले,कोषाध्यक्ष योगेश कृपानाथ चौधरी यांच्या उपस्थितीत कवी रमेश जे.पाटील यांनी अहवाल वर्षात प्रकाशित झालेले ‘नांगरफाळ’ व चांडणवेडा काव्यसंग्रह प्राध्यापक जगताप यांना भेट दिला.

यावेळी मसाप चे शंभरावे सदस्य डॉक्टर साळुंखे यांना गौरविण्यात आले.नवीन सभासद छोटू उर्फ भगवान भाऊलाल वारडे यांना शाखेतर्फे त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मानपत्रातील मजकूर कवी रमेश जे.पाटील यांनी वाचून दाखविला. अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ कवी अशोक दादा सोनवणे यांनी शाखेच्या आगामी काळासाठी आढावा घेतला.सौ.योगिता पाटील,सौ.पुनम पाटील,रेखा शिंदे,राजेंद्र चौधरी,प्राध्यापक लोहार,पी.एम.चौधरी,राजेंद्र पारे, प्राध्यापक किशोर पाठक,प्रदीप निंबा पाटील,प्रभाकर महाजन, राकेश विसपुते l,राधेश्याम पाटील,पंकज नागपुरे(कॅलिग्राफी कलावंत), नरेंद्र भावे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त इंजिनियर श्री.व्ही.एस.पाटील माय मराठी राज्य शिक्षक संघाने गौरविलेले विलास पाटील व मान्यवर सभासद यावेळी हजर होते आभार बारी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.