जिल्हा रुग्णालयासमोरून दुचाकी लांबवली

0

जळगाव:-शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर लावलेली शेतकऱ्याची 45 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली .

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सोपान सुभाष पाटील वय 39 हे तालुक्यातील राहत असून त्यांची दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डिके 56 89 हे अज्ञात चोरट्याने सिव्हिलच्या समोर असलेल्या मेडिकलच्या बाजूला लावलेली दुचाकी चोरून नेली या प्रकरनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.