जळगावच्या डॉ. मानसी चौधरीला वेटरनरी पब्लिक हेल्थ विषयात सुवर्ण पदक…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकराव्या पदवीदान समारंभात मूळ जळगाव येथील रहिवासी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थिनी डॉ. मानसी योगेश चौधरी हिला कनुभाई सावडिया सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. हे सुवर्णपदक वेटणारी पब्लिक हेल्थ या विषयात दिले जाते.

या अकराव्या पदवीदान समारंभात 2021 ते 24 या शैक्षणिक वर्षातील 1340 पदवीधर, 99 पदव्युत्तर, ३० डॉक्टररेट अशा एकूण 179 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदविधान समारंभातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल 72 सुवर्णपदक, 23 रोप्य पदक आणि 25 हजार रुपयांचे तीन रोख पारितोषिक देण्यात आले. एकूण 95 पदके व तीन रोख बक्षीसांपैकी 28 पदके आणि तीनही रोग बक्षिसे मिळवण्यात मुलींनी बाजी मारली.

व्ही पी एच हा विषय प्राणी आणि मानव या दोन जमातींचा अभ्यास करते. यामध्ये माणसांना प्राण्यांपासून किंवा प्राणीजन्य पदार्थांपासून होणाऱ्या आजारांचा अभ्यास केला जातो. या सगळ्या सोबतच पर्यावरणीय स्वच्छता व सुरक्षा या संदर्भात कायदे व उपाय योजना देखील तयार करण्यात येतात. मास, मासे, अंडी यांच्या उत्पादनात योग्य ठिकाणी योग्य त्यावेळी योग्य ते कायदे उपाययोजना अमलात आणून मानवतेचे हित जोपासण्याचा याचा मुख्य हेतू असतो.

भारत हा जगातील सर्वात जास्त दुग्धउत्पादक देश आहे. तसेच अंडी उत्पादनात जगात तिसरा देश आहे. मांस उत्पादनात आठवा देश आहे. भारत कृषीप्रधान असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था शेती व पशुपालनावर आधारित आहे. आपल्या देशातील अनिश्चित हवामान व पाऊस यामुळे पशुपालन हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे उपजीविकेचे साधन आहे. त्या दृष्टीने पशु विज्ञान व पशु शेतीचा हे महत्त्वाची भूमिका बजावणारे क्षेत्र होय.

या पदवीदान समारंभाला राज्यपाल रमेश बैस कुलपती अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते तर प्रमुख श्रीवास्तव कुलगुरू हे प्रमुख उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रतिकूलपती यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. या समारंभाला डॉ. नितीन विखे पाटील, डॉ. नितीन कुरकुरे, उपस्थित होते.

डॉ. मानसीला यामध्ये डॉ. शिल्पुश्री शिंदे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. सुनील कोलते, डॉ. संजय बानूबाकोडे, डॉ. मनोज पाटील व डॉ. शितल चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.