चिंतामणी हॉस्पिटलतर्फे उद्या थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव शहरात गरजू रुग्णांच्या सेवार्थ चिंतामणी हॉस्पिटलतर्फे थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात एम. डी. मेडिसीन झाल्यानंतर तीन वर्ष डायबेटिज, थायरॉइड व इतर हार्मोन्स विषयांमध्ये डिग्री संपादन केलेल्या व रुग्ण सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुप्रसिद्ध डॉ. चिमु चोपडे या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला रुग्णांना मिळणार आहे.

थायरॉइड शिबिराचे आयोजन दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत चिंतामणी हॉस्पिटल, ५ ओंकार नगर, पोस्ट ऑफिस रोड, बीएसएनएल ऑफिस समोर जळगाव या ठिकाणी केले आहे. तसेच या कँम्पमध्ये सहभागी होण्यासाठी ७३ रु. नोंदणी फी असणार आहे.

म्हणून ही संधी चुकवू नका, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.