घरगुती गॅसचा काळाबाजार; तरूणावर कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

घरगुती गॅसचा काळाबाजार (Gas black market) करणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली.  यावेळी त्यांच्याकडून २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव (Jalgaon) शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील स्मशानभूमी परिसरात घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करून काळाबाजार होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली.

या कारवाईत रहिमबेग हसनबेग मिर्झा (वय ३८, रा. बिसमिल्ला चौक, तांबापूरा, जळगाव) याच्याकडून १२ हजार रूपये किंमतीचे ६ घरगुती गॅसचे सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य व मशिन असा एकुण २७ हजार रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल हास्तगत करण्यात आला.

याप्रकरणी सायंकाळी पोलीस नाईक इमरान अली युसूफअली सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रहिमबेग हसनबेग मिर्झा याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.