द महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे बिनविरोध

सलग 9 व्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान सचिव पदी अनिल नावंदर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

डोंबिवली – द महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यांना सलग 9 व्यांदा अध्यक्ष व सचिव होण्याचा बहुमान प्राप्त झाला. राज्यातील 1 लाख केमिस्ट सदस्य असणाऱ्या संघटनेवर 25 वर्षा पासून प्रतिनिधित्व करीत आहे. सर्वच्या सर्व पदाधिकारी बिनविरोध झाले आहेत. दादर येथील कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. डोंबिवली असोसिएशनचे वतीने दिलीप देशमुख, विलास शिरुडे, राजेश कोरपे, निलेश वाणी यांनी शुभेच्छा दिल्या.

द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या 2023 – 26 या कालखंडाकरता निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. नामांकन पत्र घेण्याची काल अखेरची मुदत होती. पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांकरिता एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. याची अधिकृत घोषणा राज्य संघटनेच्या आमसभेत 20 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होईल. निवडणूक अधिकारी दिलीप कदम, नितीन देव, सुनिल छाजेड यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले.

राज्यातील विविध विभागातून अर्ज दाखल झाले. त्यात अध्यक्ष जगन्नाथ शिंदे ठाणे, उपाध्यक्ष मुकुंद दुबे चंद्रपूर, उपाध्यक्ष अरुण बरकसे बीड, सचीव अनील नावदंर बुलढाणा, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुष्टे रत्नागिरी, सहसचिव प्रसाद दानवे मुंबई, संघटन सचीव मदन पाटील कोल्हापूर यांची बिनविरोध निवड झाली. आहे. राज्य केमिस्ट संघटनेची नासिक येथील एक्सप्रेस इन हॉटेल मध्ये 19 व 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमसभेत अधिकृत घोषणा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.