दिवाळीनंतर मिळणार नाटकांचा फराळ; मराठी राज्य नाट्य स्पर्धा 24 नोव्हेंबरपासून

14 संघांचा सहभाग : प्रेक्षकांना सादरीकरणाचा आनंद घेण्याचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवाळीच्या सणानंतर जळगावकरांना नाटकांचा फराळ मिळणार आहे. 62 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ येथे सुरू होत आहे. 24 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. स्पर्धेमध्ये एकूण 14 संघांचा सहभाग आहे. जळगाव शहरासह जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील इतर संघही या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भुसावळ, नंदुरबार आदी ठिकाणचे संघ आपले नाटक सादर करतील. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चवरे यांनी केले आहे. जळगावात नवनियुक्त स्पर्धा समन्वयक म्हणून रंगकर्मी संदीप तायडे काम पाहत आहेत.

ही नाटकं होतील सादर –
थेंब थेंब आभाळ (अविरत, इंदुर), गोदो वन्स अगेन (भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, भुसावळ), संपेल का कधीही हा खेळ सावल्यांचा (दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, जळगाव), मजार (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), निखारे (गाडगेबाबा शै. व सांस्कृ. सेवा मंडळ शिंदे, नंदुरबार), विठ्ठला (इंदाई फाउंडेशन, जळगाव), अंकल वान्या (जननायक थिएटर, जळगाव), ती (साने गुरुजी सार्व. वाचनालय, दीपनगर), चांदणी (फ्लाईंग बर्ड फिल्म अ‍ॅण्ड थिएटर फाउंडेशन, जळगाव), हम दोनो (नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव), म्याडम (समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे, ता. एरंडोल), होय, हे हिंदू राष्ट्र आहे! (स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव) पेढे घ्या पेढे (लोकरंजन बहुउद्देशीय संस्था, जामनेर) आणि उभ्या पिकातलं ढोरं (उत्कर्ष कलाविष्कार संस्था, भुसावळ).

Leave A Reply

Your email address will not be published.