धुळ्यात 89 तलवारीसह 90 धारदार शस्त्रे जप्त; 4 जण ताब्यात

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळ्यामध्ये एका स्कॉर्पिओमधून 89 तलवारी, खंजीरासह 90 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हे शस्त्र राजस्थानमधील चित्तौडगड येथून येत असून ते महाराष्ट्रातील जालना येथे नेले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती धुळे पोलिसांना मिळाली होती. धुळे पोलिसांनी माहिती मिळताच सर्व तयारी करून ४ आरोपींना शस्त्रांसह पकडले.

धुळे पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर गावाजवळून हा जप्त केला. जालन्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून पोलिसांनी ८९ तलवारी आणि १ खंजीर जप्त केल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली. या शस्त्रांसह 4 जणांना अटकही करण्यात आली आहे.

पोलिसांनी चौघांविरुद्ध आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, राजस्थानमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र महाराष्ट्रात का आणले जात होते, हे अद्यापही गूढच आहे. अजान विरुद्ध भोंगे वाद आणि हनुमान चालीसा पठणावरून महाराष्ट्रात राजकारण तापले असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.