समृद्धी महामार्गाच्या उद्धघाटनापूर्वीच भाग कोसळला; अपघाताची मालिका सुरूच

0

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. समृद्धी महार्गाच्या पॅकेज-७ मध्ये समाविष्ट असणारा सिंदखेडराजा परिसरातील निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळल्याची दुर्घटना बुधवारी संध्याकाळी घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर कोसळलेला पूल सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ आहे. या परिसरातील डोंगराळ प्रदेशाला जोडण्यासाठी हा पूल तयार करण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी काम सुरु असताना या पूलाचा तब्बल २०० टन वजनाचा गर्डर खाली कोसळला. जेवणाची सुट्टी झाली असताना सर्व कर्मचारी दुसरीकडे गेले होते. यावेळी अचानक या पुलाचा काही भाग कोसळला आणि या पुलाखाली असलेल्या मोठ्या ट्रेलरवर पडला, त्यामध्ये ट्रेलर्स पूर्णपणे तुटला असून हा पूल कोसळताना सर्व मजूर जेवत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या तीन दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावर पूल कोसळल्याची ही दुसरी घटना आहे.

यापूर्वी समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता तर दोनजण जखमी झाले होते. या कमानीवर काँक्रिट टाकून वन्यजीवांना महामार्ग ओलांडता येईल, असा पूल बांधण्यात आला होता. मात्र, या पूलाचा अर्धा भाग कोसळला होता. समृद्धी महामार्गावर अशा एकूण १०५ कमानी आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर भविष्यातही असे अपघात घडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

समृद्धी महामार्गाचे एवढे मोठे भव्यदिव्य काम सुरू असताना अपघातांची मालिका सुरु होणे चुकीचे आहे. समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे करायला पाहिजे. तसेच राज्य शासनाने देखील या महामार्गावरील पुलाचे तसेच इतर रस्त्याचे चांगल्या प्रकारे ऑडिट करून नंतरच पूल सुरू करायला पाहजे.

Leave A Reply

Your email address will not be published.