मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांचे निवेदन

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील शेतकऱ्यांनी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना बाभोरी बु. शिवार व धरणगावला लागून 33 फूट शेत रस्ता शिवारातील गट क्रमांक 628 पासून ते बाभोरी बु शिवारातील 551 व धरणगाव शिवारातील गट क्रम 506 हिंगोने बु डांबरी रस्त्यापर्यंत शेत पाणंद रस्त्याचे निवेदन देण्यात आले.

शेतकरी व नगरसेवक भागवत चौधरी, छोटू जाधव, मोहन दिलीप पाटील, नंदू हिम्मत पाटील, राहुल रवींद्र पाटील, संतोष पुडलीक पाटील, प्रकाश चिंधु पाटील, व शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना सादर केले. यावेळी उपस्थित बाळू जाधव, पत्रकार सतीश बोरसे, विनोद रोकडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.