“शासन आपल्या दारी” हा उपक्रम चळवळ म्हणून राबवा: पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व मिळून एक जुटीने काम करूया आणि “शासन आपल्या दारी” उपक्रम चळवळ समजून राबवा असे आवाहन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. ते धरणगावातल्या हेडगेवार नगरातील जी.एस. मंगल कार्यालयात आयोजीत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल तर प्रमुख उपस्थितांमध्ये विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात १५ एप्रिल २०२३ ते १५ जून २०२३ या दोन महिन्यात तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या १८१८९ लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात २५७ लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.

राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा अतिशय महत्वाकांक्षी आणि सर्वमान्य जनतेच्या हितासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केला आहे. आज धरणगावातील हेडगेवार नगरातल्या जी. एस. मंगल कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमत मित्तल होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.