दिव्यांग स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0

जळगाव;- जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांचे स्वावलंबन होण्यासाठी जिल्ह्यात दिव्यांग स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक उत्थान व प्रशिक्षण संस्थान यांच्या माध्यमातून जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यात सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, महाबळ रोड, जळगाव येथे करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी शेळी पालन, मधुमक्षीका पालन, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय आणि गांडुळ खत निर्माती, पेपर कव्हर इन्क्लप आणि फाईल बनविणे, फास्ट फुड स्टॉल उद्यमी, उद्योजकता विकास कार्यक्रम, महिला शिवणकाम, ब्युटीपार्लर व्यवस्थापन, हलके वाहन चालक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग दुरुस्ती (फ्रिज आणि ए.सी. दुरुस्ती) टु व्हीलर मेकॅनिक, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी, मोबाईल दुरुस्ती आणि सेवा, घरगुती वायरींग फिटींग, इलेक्ट्रोक मोटर रिवाइडिंग आणि दुरुस्ती सेवा अशा सुयोग्य १६ प्रकाराच्या व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत लाभार्थ्यांकरीता प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मोफत अल्पोपहार व भोजन तसेच मोफत निवासाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे व्यवसाय उभारण्यासाठी विविध शासकीय कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन करून कर्ज मिळण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे स्वावलंबन होण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष अमन मित्तल, तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाकांक्षी असा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक बॅचमध्ये मर्यादीत प्रवेश संख्या असल्याने प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी, मोफत अर्जासाठी रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडक सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरा समोर, महाबळ रोड जळगाव येथे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटलच्या बाजुला, नवीन बी. जे. मार्केट , जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन रेडक्रॉस जिल्हा पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.