धरणगावातील नायब तहसीलदारास अटक

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी अनेक अधिकारी तत्पर आहेत. पण काही अधिकारी वाळूमाफियांकडूनच लाच घेत असल्याचे समोर आले आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसत नसल्याचे दिसून येते. आज धरणगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने धरणगाव तहसील कार्यालयात कार्याची करीत नायब तहसीलदार व एका कोटवालाला अटक केली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे.

धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती. ती तडजोडअंती २५ हजार रुपये निश्चित झाली होती. पण तक्रारदाराने जळगाव येथील एसीबीकडे याची तक्रार केली होती. या प्रकरणी आज गुरुवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी त्यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदार यांना ताब्यात घेतले आहे. धरणगाव तहसील कार्यालयात केलेल्या कारवाईने अधिकारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.