पट्ठ्याने चक्क रेल्वे स्टेशन वर पळवली कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तरुणांना आज-काल सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. आणि त्यासाठी ते काई शक्कल लढवतील त्याचा नेम नाही. असाच एक विडिओ सध्या तरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असून एक तरुण चक्क प्लॅटफॉर्मवर कार पळवताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत माहिती अशी की, आग्र्यातील एका तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर कार चालवल्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर प्लॅटफॉर्मवर कार चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कुमार असं कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्याचं सांगितलं जात आहे. तरुणाच्या या जीवघेण्या स्टंटमुळे अनेकांनी प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिवाय कार चालकावर रेल्वे कायद्याच्या अंतर्गत कलम १५९ आणि १४७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेतील तरुणाला प्लॅटफॉर्मवर कार चालवणं चांगलंच महागात पडणार आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.