जगदीप धनखर NDA चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

NDA ने आज आपला उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. सध्या प.बंगालचे राज्यपाल असलेले जगदीप धनखर हे NDA चे अधिकृत उएद्वर असणार आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायुडू यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे.

जगदीप धनखर यांच्या विषयी

धनखर यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील किठाना या छोट्या गावात झाला.  ९व्या लोकसभेत जनता दलाकडून १९८९-९१ दरम्यान राजस्थानमधील  झुनझुनू (लोकसभा मतदार संघ) येथून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. ते १९९३-९८ दरम्यान राजस्थानच्या १० व्या विधानसभेत किशनगड, राजस्थान येथून विधानसभेचे माजी सदस्य (आमदार) होते आणि राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन, जयपूरचे माजी अध्यक्ष. ३० जुलै २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.