जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क :
के. सी. ई. सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एड. चा विद्यार्थी पाटील औदुंबर रविंद्र याचे अपघाती निधन झाले होते. सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी सामुहिक अपघात मृत्यू विमा योजनेअंतर्गत महाविद्यालयामार्फत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार विमा कंपनी तर्फे विम्याची रक्कम रु. ५,००,०००/- (अक्षरी रु. पाच लाख मात्र) मंजूर झाली. तसेच विद्यापीठाकडून मा. कुलगुरु वैद्यकीय निधीतून मयत विद्यार्थ्याच्या वारसदारास मिळणारे अतिरीक्त आर्थिक सहाय्य रक्कम रु. १०,०००/- (अक्षरी रु. दहा हजार मात्र) मजूर झाली. सदर दोन्ही रकमेचे धनादेश विद्यार्थी पाटील औदुंबर रविंद्र याचे वडील रविंद्र कृष्णराव पाटील यांना प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य राणे यांनी सदर विद्यार्थ्याच्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला. या प्रसंगी एन.एस.एस. अधिकारी प्रा. पकंज पाटील, प्रा. शैलजा भंगाळे, मनिष वनकर उपस्थित होते.