वडिलांची बंदुक कपाळावर लावून दिली ठार मारण्याची धमकी

0

जळगाव :- कंबरेला पिस्तुल लावून तोंड रुमालाने बंद करीत माझे अपहरण करीत रात्रभर डांबून ठेवण्यात आले. याठिकाणी पट्टयासह लाकडी दांडक्याने मारहाण करीत खोटे अॅफिडेव्हीट दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. यावेळी माझ्या कपाळावर लावलेली बंदूक ही माझ्या अँड . पीयूष पाटील यांची वडिलांची असून ती संशयीतांकडे आली कशी? असा सवाल ऍड पियुष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

जिल्हापेठ पोलीसात दाखल केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती गुन्ह्यातील संशयित फरार आहे. या टोळीचा प्रमुख विजय पाटील असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. त्यांनी मुख्य सचिवांकडे खोटा अर्ज दाखल केला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यात ते आरोपी असून त्यांच्यावर मोक्का किंवा एमपीडीए सारखी कारवाई करावी. यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार असून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी माहिती अॅड. पियुष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.