जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांना कृषी विभागाचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी कृषी विभागामार्फत महाआयटीद्वारे तयार केलेल्या नवीन संगणकीय प्रणालीद्वारे आपले सरकार या संकेतस्थळावर कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना आवश्यक कागदपत्रे समक्ष जमा न करता विहीत मुदतीत मिळणार आहे. त्यासाठी आपले बियाणे व खत परवाने आपले सरकार या वेब पोर्टलवर नोंदणी करुन परवाना अद्ययावत करुन घ्यावा.

तसेच कापूस बियाणे विक्रीकरीता नवीन परवान्यासाठी अर्ज करावा. सदरचा अर्ज स्वत: किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (C.S.C.) यांचेमार्फत अर्ज करावा. आपल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना आपले सरकार वेब पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र (स्कॅन करुन अपलोड करणे), आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, कागदावर केलेल्या स्वाक्षरीचा नमुना, जागेचे कागदपत्र (८-अ खाते उतारा), जागा मालकाचे संमतीपत्र, जागा भाड्याची असल्यास ५ वर्षाचा करारनामा, ना हरकत दाखला (म.न.पा., न.पा, न.प.,ग्रामपंचायत), शैक्षणिक दाखले, ऑनलाईन ग्रास प्रणालीद्वारे भरलेल्या चलनाची प्रत, जीएसटी क्रमांक, अक्षांक्ष व रेखांक्ष (विक्री व साठवणूक स्थळाचे), बियाणे व खत परवाना (जुन्या परवानाधारकांसाठी), डी.आय.सी. प्रमाणपत्र (उद्यम आधार प्रमाणपत्र), शॉप ॲक्ट परवाना, पार्टनरशिप फर्म असल्यास भागीदारी पत्रक व भागीदारकांचे आधार व पॅनकार्ड इत्यादी.

जिल्हयातील सर्व कृषि केंद्रानी आपले परवाने आपले सरकार या वेब पोर्टलवरुन 30 एप्रिल 2022 पुर्वी अद्ययावत करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.