धावत्या रेल्वेखाली सापडुन अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान घडली घटना

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून, छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे पाचोरा लोहमार्ग पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७२ / ३९ नजीक डाऊन ट्रॅकवर एक छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिसांना मिळाल्यानंतर ए. एस. आय. अनिंद्र नगराळे, पोलिस काॅन्स्टेबल विलास जाधव हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे, अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक बबलु मराठे व अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटविण्याचे काम चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. अनिंद्र नगराळे हे करीत आहेत. मयताचे अंदाजे वय ५० वर्ष असून उंची ५ फुट ५ इंच, रंग – सावळा, शरीर बांधा – मध्यम, डोक्याचे केस – काळे बारीक असे वर्णन असुन मयता विषयी कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात कळवावे असे आवाहन ए. एस. आय. अनिंद्र नगराळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.