एक इंजेक्शन आणि २ जणांचा क्षणार्धात मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेथील एका रूगनलायत एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूसाठी रुग्नालयातील डॉक्टरच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कोपर खैरणे मधील आकाशदीप रुग्णालयात एका तरूणाचा आणि एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त आणि शोकाकुल नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, आकाशदीप रुग्नालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक तरुण आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघांनाही दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णांपैकी महिलेच्या पोटावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. तर त्या तरुणावर मुळव्याधाची शस्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर दोघांनाही इंजेक्शन देण्यात आले आणि काही वेळातच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. थोड्या वेळापूर्वी आपले जे लोक चांगले होते. ते अचानक गेल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे.

डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यानेच दोघांचाही मृत्यू झाल्यांच आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यासाठी त्याने तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरू आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.