तरुणाचा मृतदेह आढळला ग्रामपंचायतीच्या विहिरीत

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल (Yawal) तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसांपासून बेपत्ता (missing) असलेल्या विवाहित तरुणाचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

गणेश दिलीप ढाके (वय ३२, रा. डोंगर कठोरा तालुका यावल) हा तरूण दिनांक १८ नोव्हेंबरपासुन हरवल्याची नोंद यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

गणेश ढाके यांचा मागील चार दिवसांपासून सर्वत्र शोध सुरू असतांना अखेर आज २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या गावातील विहीरीत बेपत्ता असलेले गणेश ढाके या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मयत तरूणाचे प्रेत ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. गणेश ढाके यांचा मृतदेह अत्यंत कूजलेल्या अवस्थेत असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत जागेवरच मृतदेहाचा पंचनामा करून गणेश ढाकेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

याप्रकरणी धनंजय फालक यांनी खबर दिल्यावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सदरचा तरुण हा डोंगर कठोरा गावात पत्नी, दोन मुले, आई या कुटुंबासोबत राहतात. मोलमजुरी करीत तो आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.