संतापजनक; आधी दारू प्यायली आणि पतीसोबत केले असे काही….

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजस्थानच्या मेवाड भागातील उदयपूरमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याचा बदल घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, पत्नीने आधी दारू प्यायली, आणि मग नशेच्या भरात तिने पतीची हत्या केली. अखेर पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यावर त्यांनी कसून चौकशी केली असता, हत्येचा उलगडा झाला. पत्नीनेच पतीचा जीव घेतल्याचे समोर आल्यावर, एकच खळबळ माजली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर जिल्ह्यातील झाडोल भागातील गोदाना गावात १९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. दलपत असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी प्रकरणी हत्येतील आरोपी पत्नी आणि तिच्या काकूही अटक केली आहे.

झोपलेला असतानाच साडीने आवळला गळा

दलपतच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी व काकूने त्याला जीवे मारण्याचा सापळा रचला. त्याची पत्नी थावरीने १९ रोजी साडीच्या साहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला. त्यात तिच्या काकूंची सुद्धा तिला पूर्णपणे साथ मिळाली. खून झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थावरीने तो घरापासून दूर असलेल्या खड्ड्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांची विचारपूस केली असता, तो टॉयलेटला गेला होता पण, परत आला नाही. असे थावरीने सांगितले. त्यानंतर २० डिसेंबर रोजी दलपतचा मृतदेह सापडला. तसेच मृतदेहावर अनेक जखमा होत्या. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. पती-पत्नीच्या नात्यातील कटुतेची बाब समोर आल्यावर थावरी हिच्यावर संशय बळावला.

पोलिसांनी कसून तपासणी केली असता, दलपटाच्या मृत्यूचे गूढ उलगडले. आपणच पतीची हत्या केल्याचे आरोपी पत्नीने सांगितले. मात्र त्याची हत्या करण्यापूर्वी मी दारू प्यायले होते. असेही तिने काबुल केले. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी थावर आणि तिची सहकारी काकू यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. हत्येचा आरोप असलेल्या दोन्ही महिलांची पोलीस चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.