महिला मगरीला खाऊ घालत असताना, मगरीने महिलेलाच जबड्यात पकडले; पहा व्हिडीओ

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

असं म्हणलं जातं की, वन्य प्राण्यांपासून तुम्ही जितके अंतर राखाल तितके चांगले. अनेकदा प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे काही लोक कूल दिसण्यासाठी रीळ किंवा फोटो काढण्यासाठी कधी कधी जाणून-बुजून क्रूर प्राण्यांची छेड काढण्याची चूक करतात, तर कधी आपल्या आजूबाजूला झालेली लोकांची गर्दी पाहून वन्य प्राणी हल्ला करताना दिसतात. नुकताच असाच एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एक मगर आपल्या देखभालकरणाऱ्या महिलेवर क्रूरपणे हल्ला करताना दिसत आहे.

मगरीने जबड्याने हात पकडला.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अमेरिकेतील उटाह येथील असल्याचे सांगितले जात आहे, जेथे साडेआठ फूट लांबीच्या मगरीने स्केल अँड टेल रेप्टाइल सेंटरमधील महिला ऑपरेटरवर अचानक हल्ला केला. यावेळी भयानक शिकारी चा हा धोकादायक हल्ला पाहून तेथे आलेले पर्यटकही थक्क झाले. काही वेळ आरडाओरडा झाला. व्हिडीओच्या सुरूवातीला असे दिसून येते की, मगरीच्या पिंजऱ्याभोवती काही मुले आणि प्रौढ कसे असतात, मग रेप्टाइल सेंटरमधील केंद्रातील ऑपरेटर मगरीला जेवण देण्यासाठी येते. दरम्यान अचानक मगरीने तिचा हात आपल्या जबड्याने पकडून तिला आत खेचले.

येथे व्हिडिओ पहा

भयानक शिकारीचा हल्ला

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हौदाच्या आत महिलेला पाहिल्यानंतर एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी धावतो. प्राणीपालाचा हात मगरीच्या तोंडातून सोडवण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करू लागतो. तिला वाचवण्यासाठी तो आपला जीव पण धोक्यात घालतो. व्यक्ती मगरीच्या वर चढतो आणि मगरीवर बसतो, त्यानंतर केंद्रातील इतर कर्मचारी कसेतरी महिलेला मगरीपासून मुक्त करतात आणि तिला घेऊन जातात. ही घटना २०२१ ची आहे. या घटनेचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हल्ल्यात हाताची हाडे मोडली

एका मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेत 48 वर्षीय व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित राहिला, तर 31 वर्षीय महिलेच्या मनगटाची आणि हाताची हाडं तुटली. यामुळेच डॉक्टरांना तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.