धक्कादायक… ११ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिल्यावर प्रकार उघड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे

लोणी काळभोर: आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देऊन एका अकरावर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी तीन ते चार वेळा घडली आहे. याप्रकरणी सोनू उर्फ सिध्दराम ज्ञानेश्वर भालेराव (वय-२५, रा. बोरकर वस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील अकरा वर्षांची पीडिता तिच्या आई, वडील, दोन बहिणी व एका भावासह सध्या लोणीकाळभोर परिसरात येते राहते. तिचे वडील मजुरी, तर आई मिळेल त्याठिकाणी धुणी, भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

भालेराव याची सदर कुटुंबाशी ओळख असल्याने पीडितेच्या घरी त्याचे येणे-जाणे असते. ६ फेब्रुवारी रोजी पीडिता मुलीच्या पोटात दुखत होते. तिला डॉक्टरकडे नेले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने सांगितले की, तीन ते चार महिन्यांपूर्वी दुपारी घराच्या मागे भांडी घासत असताना सोन्या भालेराव याने माझ्या हाताला धरून बाथरूममध्ये ओढत नेले आणि रुमालाने तोंड बांधून बलात्कार केला, असे त्याने तीन ते चार वेळा केले आहे व जर याबाबत वाच्यता केली, तर आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौगुले या करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.