पत्र्याच्या शेडमध्ये साठवूण ठेवला 18 लाखांचा गांजा ; पोलिसांची धाड, संशयित फरार.

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरपूर ; धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील पश्चिम पट्यातील उमरपाटा शिवारात असलेल्या गव्हाळीपाडा, चरणमाळ गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला १८० किलो ग्रॅम वजनाचा तब्बल १८ लाखांचा, चार प्लास्टिकच्या गोणीत भरलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे.

यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. त्याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. उमरपाटा शिवारातील गव्हाळीपाडा येथे दिलीप बारशा कुवर (मावची) याने राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गांजा साठवून ठेवल्याची खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री सव्वा दोनच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पोलिसांना तेथे साठवून ठेवलेला तब्बल १८० किलो गांजा हाती लागला. बाजारभावाने त्याची किंमत १८ लाख इतकी आहे. मात्र पोलिस कारवाईचा सुगावा लागल्याने दिलीप कुवर हा मात्र, अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनी प्रकाश पाटील, सपोनी सचिन साळुंखे, पोसई. योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, पोसई. प्रदीप सोनवणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, तुषार पारधी, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राहुल गिरी, तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. प्रविण अमृतकर, पोना. दिपक पाटील, संदिप पावरा, भास्कर सूर्यवंशी यांनी केली आहे.  पोकॉ. राहुल गिरी यांच्या फिर्यादीवरुन पिंपळनेर पोलिसांत दिलीप कुवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. सचिन साळुंखे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.