बापरे.. लग्नाची मागणी घालत तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे; लग्नाची मागणी घालत तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण. प्रेम व्यक्त करण्यासाठी तरूणीच्या घराबाहेर येणे, चाकू हातात घेऊन तरूणीला घराबाहेर बोलवणे… तसेच ती नाही आले तर तिला दरवाजा तोडून पळवून नेण्याची धमकी देणे, असे फिल्‍मीस्‍टाईलचा प्रकार पुणे येथे एका तरूणाने केले. त्‍यानंतर त्‍याने तरूणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत मुलीचे अपहरण करून तिला प्रपोज केले.

मात्र त्याला हे कृत्य चांगलेच महागात पडले. विनयभंग, अपहरण, हत्यार बाळगणे, धमकावणे, मारहाण करणे या प्रकरणात तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असा हा फिल्मीस्टाईल प्रकार पुण्यातील येरवडा येथील साळवेनगर येथे घडला.

प्रेम करणार्‍या तरूण निहाल विशाल भाट (रा. कंजारभाट, येरवडा) असे या तरूणाचे नाव आहे. याच्याविरूध्द एका 20 वर्षीय तरूणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

फिर्यादी तरूणी आणि संशयीत आरोपी तरूण हे शाळेत एकत्र शिकत होते. तसेच ते चांगले ओळखीचे आहेत. शनिवार (दि. 16) तरूणी तिच्या घरी असताना आरोपी चाकू घेऊन तिच्या घरासमोर आला. तिच्या दरवाजा समोर उभे राहुन तू घराबाहेर ये, माझ्या सोबत चल, असे म्हणून हातातील चाकू त्याने हवेत फिरवला.

त्यानंतर त्याने तू जर बाहेर आली नाही तर, मी दरवाजा तोडून घरात घुसेल, व मला कोणी आडविण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला जीवंत सोडणार नाही. अशी धमकी देवून फिर्यादीला जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवरून तिचे अपहरण केले. त्यानंतर तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर प्रेम व्यक्त करत तिला लग्नाची मागणी घातली.

परंतु, फिर्यादीने त्याला नकार दिला असता तरूणाने तिला मारहाण केली. तसेच तिच्या दंडावर पाठीवर, गालावर दाताने चावा घेऊन, चाकुच्या मागील बाजून तिच्या पायावर मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी निहाल याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.