ब्रासिलिया;- एखाद्या गायीची किंमत जास्तीत जास किती असणार असा तुम्हाला कोणी प्रश्न विचारल्यास तुम्ही ५ पंचवीस लाखर रुपये सांगाल . मात्र हे काही खरे नाही भारतीय वंशाची गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली आहे .
ही गाय आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील आहे. तिला ‘व्हिएटिना-१९ एफआयव्ही मारा इमोव्हिस’ या नावाने ओळखले जाते. ब्राझीलमध्ये एका लिलावादरम्यान या गायीची किंमत ४.८ मिलियन अमेरिकन डॉलर्सची बोली लागली. जी भारतीय रुपयांप्रमाणे ४० कोटी रुपये इतकी आहे. यामुळे ही जगातील सर्वात महागड्या किमतीत विकली जाणारी गाय ठरली आहे. गुरांच्या लिलावाच्या इतिहासात ही विक्री मैलाचा दगड ठरली आहे. रेशमी पांढरा रंग आणि खांद्यावर विशिष्ट बल्बस कुबड असलेली ही
या गायीचे नाव नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये या जातीला मोठी मागणी आहे. या जातीला वैज्ञानिकदृष्ट्या ‘बोस इंडिकस’ नावाने ओळखले जाते. शास्त्रज्ञांच्या मते, ही गाय भारतातील ओंगोले गुरांची वंशज आहे, जे त्याच्या ताकदीसाठी ओळखले जातात. विशेष बाब म्हणजे ही गाय वातावरणानुसार स्वतःला जुळवून घेते. ही प्रजाती १८६८ मध्ये जहाजाने प्रथमच ब्राझीलला पाठवण्यात आली होती. १९६० च्या दशकात आणखी अनेक गायी पाठवण्यात आल्या. ओंगोल जातीच्या गुरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय उष्ण तापमानातही राहू शकतात. कारण त्यांची चयापचय क्रिया चांगली असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. ब्राझीलमध्ये खूप उष्णता आहे, त्यामुळे ही गाय तिथल्या पशुपालक आणि शेतकऱ्यांना खूप आवडते. तिथले लोक तिला सहज सांभाळू शकतात. ही जात जनुकीयदृष्ट्या विकसित करण्यात आली आहे.