राज्यात अलर्ट ! सिंधुदुर्गात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशासह राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. देशात सर्वप्रथम ‘जेएन. १’ या ओमिक्राॅनच्या (काेराेना) व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षांच्या पुरुषालाही या व्हेरिएंटची लागण झाली आहे. या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत. तसेच याची साैम्य लक्षणे असून, ताे बरा हाेताे, असेही आराेग्य विभागाने म्हटले आहे.

केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षांच्या महिलेला या ‘जेएन.१’ विषाणूची लागण झाली हाेती. आता ती महिला पूर्णपणे बरी झाली आहे. ‘जेएन.१’ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असे आराेग्य विभागाने म्हटले आहे.

राज्यामध्ये नियमितपणे काेराेनाबाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनाेम सिक्वेन्सिंग) करण्यात येत आहे. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.

‘जेएन.१’ या कोविडच्या नव्या विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. याबाबत काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. याशिवाय कोविड संबंधित नियमावलीचे पालन करा, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.