धक्कादायक.. तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून घेतला स्वॅब; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोरोना टेस्टसाठी घशातून स्वॅब टेस्ट घेतली जाते. मात्र, घशाऐवजी तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून स्वॅब घेतल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोषी आरोपीला न्यालायालायाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे

अमरावतीत ही धक्कादायक घटना दीड वर्षापूर्वी घडली होती. या धक्कादायक प्रकाराचा निषेधही मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आला होता. आरोपी अलकेश अशोकराव देशमुख (वय ३२, रा. पुसदा) हा लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. आरोपी अलकेशच्या विरोधात बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या अलकेश नावाच्या आरोपीने कोरोना चाचणीसाठी तरूणीचे घशातून स्वॅब घेतल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमधून स्वॅब घेतल्याचा आरोप त्या तरुणीने केला होता. त्यानंतर पीडित तरूणीने पोलिसात तक्रार केली होती. आरोपी अलकेशला अटक करण्यात आली असून आता कोर्टाने आरोपी अलकेशला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?

पीडित तरूणी नोकरीनिमित्ताने अमरावतीमध्ये आपल्या भावाकडे राहत होती. कोरोना महामारीच्या काळात काही लक्षणे असल्यास प्रत्येकजण आपली कोरोना चाचणी करत होते. अमरावती शहरात ऑफिसमधील सहकाऱ्याला करोनाची लागण झाल्याने २८ जुलै २०२० रोजी तरुणी कोरोना चाचणी करण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत इतरांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत तिला परत बोलावण्यात आले होते.

आरोपीने तरुणीला युरीन टेस्ट करण्यास सांगितली. तरुणीसोबत तिची महिला सहकारीदेखील होती. त्यांनी महिला कर्मचारी आहेत का ? असं विचारलं असता आरोपीने नकार दिला. त्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून स्वॅब घेतले आणि रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. पण अशा पद्धतीने प्रायव्हेट पार्टमधून नमुने घेतल्याबद्दल शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला सांगितलं. तत्काळ त्यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली.

त्यावेळेस अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. पोलिसांनी तपासानंतर अलकेशला बेड्या घातल्या. आता कोर्टाने या प्रकरणी अलकेशला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.