कोरोनाचा विस्फोट; प्रतिष्ठित एम्समध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

कमी झालेला कोरोना (Corona) आता पुन्हा जोर धरू लागला आहे. एम्स व्यवस्थापनाने (AIIMS Hospital) कामाच्या ठिकाणी योग्य स्वच्छता आणि वारंवार स्वच्छता सुनिश्चित केली पाहिजे असं म्हटलं आहे. शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड रुमाल/टिश्यूने झाका, असं म्हटलं आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखा. संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी फेस कव्हर किंवा सर्जिकल मास्क वापरणे आवश्यक करण्यात आले आहे.

भारतात (India) पुन्हा एकदा कोरोनाने धोक्याची घंटा वाजवली आहे. दिल्लीतील प्रतिष्ठित एम्समध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एम्सने एक एडव्हायजरी जारी केली आहे. कोरोनाबाबत डॉक्टरांनी योग्य नियम पाळावेत, असे संस्थेने म्हटले आहे. सर्व रुग्णालयातील कर्मचार्‍यांना कामावर त्यांचे सर्जिकल मास्क घालण्यास सांगितले आहे आणि गर्दी टाळण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.