यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण

0

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सपत्नीक कोरोना लागण झाली असून पहिल्या टप्प्यातील लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने तपासणी करून घेतल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पत्नी वर्षा मानगावकर यांना गेल्या चार दिवसांपासून ताप आल्याने स्वतःहून या दाम्पत्याने आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यात त्यांचा आरटीपीसीआर अहवाल हा कोरोनाबाधीत आल्याने दोघांवर घरीच उपचार सुरू करण्यात आले. आपल्या निवासस्थानी हे दाम्पत्य कॉरंटाईन असून प्रथम टप्प्यातील लक्षणे असल्याने तातडीने त्यांच्यावर उपचार झाले असून दोघांची प्रकृती मात्र आता चांगली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.