नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती, २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशभारत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. राज्यात मागच्या २४ तासांत ७०० हुन अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामध्ये काल दोघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलने गुरुवारी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ४,४४० ते ४,४२३ सक्रिय रुग्ण होते. तर केरळ आणि कर्नाटकमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज एकूण मृतांची संख्या ५,३३, ३७३ झाली आहे. कोरोनाच्या आजारातून तब्बल ७७५ लोक बरे झाले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४.४४ कोटी झाली आहे. असे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मृत्यूची दर १.१८ टक्के झाला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा प्रादुर्भाव हा हिवाळा आणि वातावरणातील बदलामुळे होत आहे. सध्या देशात या नव्या व्हेरिएंटची एकूण ५११ रुग्ण आहेत. ज्याची सर्वाधिक नोंद कर्नाटकात झाली आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या केरळमध्ये १४८, कर्नाटकात १९९, गोव्यात ४७, गुजरातमध्ये ३६, महाराष्ट्रात ३२, तामिळनाडूत २६, दिल्लीत १५, राजस्थान ४, तेलगंणा दोन आणि ओडीशा आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

अशातच केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रकरणांच्या संख्येत होणारी वाढ आणि देशात JN.1 चा व्हेरिएंट आढळून येत असतांना जागरूक राहण्यास सांगितले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. घराबाहेर निघत असला तर, मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.