Corona ; पुण्यात सापडला आणखी एक रुग्ण, राज्याचा आकडा ४२ वर

0

पुणे : कोरोनाच्या संसर्गाने भारतासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. पुण्यात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.  त्यामुळे पुण्यात एकूण १८ तर महाराष्ट्रात ४२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.हा रुग्ण फ्रान्स आणि नेदरलँडमधून फिरुन आला होता. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी माहिती दिली.

दरम्यान, राज्यात काल मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात आज पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना देण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.