बोदवड परिसरात अवकाळी पावसासह गारपीट

0

बोदवड (प्रतिनिधी) :- परिसरात दि.१७ रोजी अचानक संध्याकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने गारपीटसह हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने ओढून घेतला आहे.

यामध्ये गहू,हरभरा,केळी,मका पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता असून सायंकाळी विज पुरवठा बंद झाला होता.दुपारी २ वाजेच्या सुमारास वातावरणात गारवा जागवत होतो.नंतर सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन १५ मिनिट पावसाने गारपीटसह हजेरी लावली.

Leave A Reply

Your email address will not be published.