आभाळमाया फाऊंडेशनतर्फे निराधार महिलेला मदतीचा हात !

0

बोदवड (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सुरवाडा येथील निराधार असलेल्या व त्याचंबरोबर मुलगा मनोरुग्ण असलेल्या महिलेला बोदवड येथील आभाळमाया फाऊंडेशनकडुन ‘माणुसकीची साद एक हात मदतीचा’ देत त्यांना गृहउपयोगी वस्तू,चादर देऊन मायेची उब देण्यात आली.यावेळी फाऊंडेशनचे सदस्य तथा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सरचिटणीस गोपाळराव पाटील,महेश अहिर,अनिलराव संभाजीराव पाटील,तसेच गावातील फाउंडेशनच्या सदस्या तथा उपसरपंच हेमलताताई पाटील गावचे सरपंच अनिल पारधी,गणेश पाटील बाळु पाटील,मनोहर सुरवाडे,सुपडु जवरे डॉ.उदय पाटील,उपस्थित होते.उपस्थितांनी फाऊंडेशनच्या या मदतीचे व त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

यावेळी फांऊडेशनच्या सदस्यांना जितु पाटील,मुकेश गोसावी महाराज यशवंजी महाराज,राहुल जैस्वाल,प्रशांत पाटील सर,रविंद्र पाटील,चंद्रकांत पाटील,गोपाल गोंधळी,भगवान पाटील,सचिन कोशे,कैलास पाटील,किशोर जैन,जितेंद्र पाटील,प्रमोद पाटील,समाधान पाटील,रमेश पाटील,प्रदीप सुकाळे,भागवत पाटील,सिमाताई बांते,शिवाजीराव पाटील,रविंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.