जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

डॉ. विद्या गायकवाड यांची जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासन निर्देश प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

३० एप्रिल रोजी जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाची सूत्रे कुणाच्या हाती येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान ३० एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता. आता त्यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. डॉ. विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.