धक्कादायक; रुग्णालयातून चक्क २० दिवसांच्या बाळाची चोरी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून २० दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केली आहे. तसेच बाळाला सुखरूप आईकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची २५ दिवसांपूर्वी कांदिवली पशचिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला मात्र बाळाचे वजन कमी आणि अशक्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु होते. याच दरम्यान मालवणी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल करत तिच्या वीस दिवसाच्या बाळाची चोरी केली.

मुलाची चोरी करून ती पळून गेली. पळून जातानाची दृश्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीत. मुल चोरी झाल्याप्रकरणी मुलाच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गीते यांनी तपासाला सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.