सलग ३ दिवस बँक बंद, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँक बंद असणार आहे. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बँक एकूण १६ दिवस बंद असणार आहे.

जानेवारी २०२४ मध्ये बँक १६ दिवसांसाठी बंद असणार आहे. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू या प्रादेशिक सणांना लक्षात घेऊन सोमवारी 15 जानेवारी रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/ माघे संक्रांती/ पोंगल माघ बिहूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम आणि आसाममध्ये 15 जानेवारी रोजी बँका बंद राहतील. याचा अर्थ बँक सलग ३ दिवस बंद राहणार आहे. १३ जानेवारीला महिन्यातील दुसरा शनिवारी आहे. रविवारी बँक बंद असते आणि सोमवारी १५ जानेवारीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांचं कामकाज बंद असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.