राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात कृषी मार्गदर्शन व स्वयंरोजगार संबंधी व्याख्यानांचे आयोजन

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला, शास्त्र य वाणिज्य महाविदयालय, चोपडा व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एककाच्या तर्फे विशेष “हिवाळी श्रमसंस्कार शिबीर” कर्जाने या गावात आयोजित केले. असून त्यादरम्यान दि. 24 जानेवारी 2023 रोजी बौद्धीक व्याख्यान कार्यक्रमात दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी चोपडा यांनी “पौष्टीक तृणधान्यातील आहाराचे महत्व” या विषयावर सखोल माहिती दिली. त्यात वरी, भगर, नाचणी तसेच मिलेट्स यांचा आहारात उपयोग केल्यास आपल्याला बऱ्याच आजारापासून आपला बचाव होतो. या विषयी माहीती दिली, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, केळी वेफर्स, दुध व दुग्धजन्य पदार्थ या उद्योगांविषयी सुद्धा माहिती दिली. तर दुसरे वक्ते आर.एम. पाटील मंडळ कृषी अधिकारी चोपडा यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व ऑनलाईन प्रणाली विषयी तसेच महाडीबीटी पोर्टल, ऑनलाईन अर्ज करण्या पदधती सांगितले.
युवकांसाठी विविध कृषी विषयक योजना जसे सिंचन सुविधा योजना, यंत्र अवजारे, शेड-नेट हाउस, अवजार बँक, पोखरा योजना, तुती लागवड करून आपला स्वतःचा रोजगार मिळू शकतो. व त्यातून प्रति महिना 30 हजार पर्यंत फायदा होवू शकतो असे सांगितले. नाडेप गांडुळ खत निर्मिती प्रकल्पा विषयीच्या योजनांची सुद्धा त्यांनी माहिती दिली. एम. वाय. महाजन (कृषि पर्यवेक्षक, चोपडा) व महेंद्र साळुंखे (बी.एम.टी, चोपडा) हे उपस्थित होते. त्याठिकाणी मोफत पालेभाज्या व फळभाज्या बियाणांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भुवनेश्वरी शार्दूल या विद्यार्थिनीने केले.

आभार प्रदर्शन डॉ प्रदीप एन. सौदागर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ( रा. से.यो.) यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ .पी. के. लभाणे, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, श्रीमती एस बी पाटील, श्री बी. एच देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कृती कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील व महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले

Leave A Reply

Your email address will not be published.