कॉपी करू दिली नाही म्हणून महिलेने शिक्षकास चपलेने चोपले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर सर्वांचं एक वेगळच जग आहे. इथं एखादा व्हिडीओ किंवा फोटो टाकता की तो कमी वेळातच व्हायरल होतो. सोशल मीडियाच्या जगात अनेक धक्कदयाल आणि गमतीदार व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत एक महिला शिक्षकास मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

नेमंक काय घडल…?
हा व्हिडीओ बिहारमधील भागलपुरचा आहे. भागलपूर विद्यापीठात कायद्याच्या पदवीसाठी परीक्षा घेण्यात येत होती. परीक्षेच्या दरम्यान या महिलेला शिक्षकानं कॉपी करतांना पकडली. तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यानतंर शिक्षकाला मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. इतकेच नव्हे तर सुरक्षारक्षक तिला थांबवण्यासाठी आले असता, महिलेने त्यांना देखील मारहाण केली. स्वतःची चूक मान्य न करता तिने पोलिसांसोबत सुद्धा डोकं लावले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरूचं स्थान सर्वांच्या आयुष्यात खूप महत्वाचे असते. परुंतु शिक्षकांसोबतचे होणारे गैरप्रकार थांबायचे नाव घेत नाही आहे. कुठे ना कुठे याला आळा घालणे गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.